स्मृतींची चाळता पाने
स्मृतींची चाळता पाने
1 min
160
आठवणींचा सुटे ना गुंता
चालू असते येणे जाणे
मिळतो पहा उजाळा
स्मृतींची चाळता पाने
हसवतात मनमुराद
कधी गातात रडगाने
कडू गोड वाटे अशी
स्मृतींची चाळता पाने
निवांताची चार क्षण
गुणगुणत रहा गाणे
तराणे या जीवनात
स्मृतींची चाळता पाने
काही गुपीते असे
असते चांगले लपवने
अचानक येती समोर
स्मृतींची चाळता पाने
प्रत्येकाची कहानी
पुढेच जात राहणे
पळभर तरी थांबतो
स्मृतींची चाळता पाने
