स्मरणात
स्मरणात
1 min
153
मामाच्या गावी
उन्हाळा सुट्टीत
माझे बालपण
गेले आनंदात
रानोमाळी हिंडे
करवंद शोधी
लांडग्यांच्या टोळ्या
दिसतसे कधी
टायरचा चक्का
गावभर फिरी
शेण ते गाईचे
सारवण्या घरी
कोंबडयास दाणे
टाकण्यास जाणे
धारोष्ण ते दूध
तेथेच हो पिणे
आज स्मरणात
क्षण आनंदाचे
फिरून पुन्हा ना
परतून यायचे
