समईची मंदज्योत
समईची मंदज्योत
1 min
574
शांत शांत तेवतात,
समईची मंदज्योत,
श्रांत मन होत जात,
अंतर्मन उजळीत ।। १ ।।
ज्योत जळे देव्हाऱ्यात,
भोगाची आस मनात,
चित्त रमे विषयांत,
परी नीती अध्यात्मात ।। २ ।।
समईची मंद वात,
पसरे रे दिगंतांत,
क्षणभंगूर प्रपात,
मन अडके मोहात ।। ३ ।।
अशांतता जीवनात,
धीर गंभीरता देत,
संकटाला देई मात,
पुढे मदतीचा हात ।। ४।।
राही ती मंद जळत,
स्पर्धा ना ती करत,
झेप घे आकाशात,
अखंडता अविरत ।। ५।।
