स्मार्टफोन कैदी (अभंग)
स्मार्टफोन कैदी (अभंग)
1 min
12.2K
लॉकडाऊनचा | संदेश तो आला |
गोंधळ उडाला I जनतेचा ॥ १ ॥
घरात बसावे | सांगा आता कसे ? I
जगायचे कसे? | मर्यादेत ॥ २ ॥
स्मार्टफोन झाला | सगा तो सोयरा I
ठेवीयले घरा I घरपण ॥ ३ ॥
त्याच्याच कैदेत | सुख ते मानले I
घरीच राहिले | फोन धारी ॥ ४ ॥
लॉकडाऊन ते | संपेल उद्याला |
फोनच्या कैदयाला | जन्मठेप ॥ ५ ॥
