श्वास कोंडला..
श्वास कोंडला..
1 min
11.5K
अवघी अवनी व्यापली
कोंडला तिचा श्वास
स्वस्त जाहला मृत्यु आज
चहुकडे त्याचाच भास.
अणुरेणूची आपली अवनी
वरचढ विषाणु ठरला वन्ही
भकास भासे अवघे विश्व
कोणता उपाय कळेना काही.
मर्यादा सांभाळू उंबरठ्याची
यातच आहे खात्री जीवाची
संयमाने हरवू या कोरोनाला
स्वप्ने पाहू या पुन्हा नव्याची
