STORYMIRROR

Priti Dabade

Others Children

3  

Priti Dabade

Others Children

शून्य

शून्य

1 min
232

वेगळाच आहे 

अंक शून्य

महत्त्व नसे

कोणास अन्य


कधी म्हणतात

त्यास भोपळा

आकाराने आहे

थोडा आगळा


शून्याला शोधण्यात

भारतीय आद्य

धन ऋणचा

तो मध्य


गुणांच्या बाबतीत

नकोसा वाटतो

पैशात मात्र 

हवासा होतो


कधी सारेच

शून्य होते

शुन्यातूनच सुरुवात 

करावी लागते


शून्य मिळविण्या

नाहीत कष्ट

पदरी पडता

सारे नष्ट


गुणता भागता

दुसऱ्यास हरवतो

लागता संख्येपुढे

किंमत वाढवतो


आहे तसा

तो हिरो

इंग्रजीत म्हणतात

त्यास झिरो


शून्यास समजू

नका कमी

परिस्थिती बदलण्याची

देई हमी


Rate this content
Log in