शुक्रवार...!
शुक्रवार...!
1 min
645
शुक शुक आवाज कानी येता
क्रय शक्ती चेतावली
वाटेतली काठी हाती आली
रग अंगात वेगळीच भरली
सुगावा देखील लागला नाही
प्रथमच घरी आल्या पाहुण्याला
भाग्य दुर्भाग्य समजण्या आधीच
तडफड गडबड त्याची थंडावली
खुसखुस त्याची सुरू होती
पण नजर कानोसा घेत होती
खुळचट पणाच सारा चालला होता
पण नजर त्याचा वेध घेत होती
छाननी सुरू असताना सावधानतेने
नकळत डोळे चमकले त्याचे
आता दुर्भाग्य माझ्या हाती आहे
हे त्या पाहुण्याला कळलेच नाही
चाहूल लागता धूम ठोकली त्याने
डोके उलटे गाठले माझे काठीने
सौभाग्यात पलायन पार पडता
कपाळ फुगले क्षणात टंणू गाठीने...!
