शुक्रवार सांजवेळ...!
शुक्रवार सांजवेळ...!
1 min
13.8K
शुक्रवार सांजेला अंबाबाई पावली खरं.!!!
शु द्ध मनाच्या रेस मध्ये
क्र मांक तुझा पहिला
वा हवा होती तुझी
र डतोस कशाला....!
सां डलास जन्म सारा
जे रीस आणण्या कुकर्मांना
ला ल दिवा दिसला अनाचाराला
अं तरंग सारे पालटले...!
बा रीक सारीक चुका दुरुस्त झाल्याही
बा हुबळातही पुष्टता आली
ई वल्या इंद्रधनुष्यासम स्वाभिमानाची
पा लवीही मनोआकाशी फुटली...!
व जन वाढले सृजनांचे
लि न होता आईचे चरणाशी
ख र खर गेली सारी निघून
र ग वाढण्या उन्नत जीवनाची....!!