शुक्रवार छान घालवूया...!
शुक्रवार छान घालवूया...!
1 min
270
शुक्रवार छान घालवूया....!
शु भरात्री संदेश वाचून बरे वाटले
क्र य शक्तीस विश्रांती मिळावी म्हणून
वा ट न पाहता झोपेची
र ग ओढला आणि डोळे झाकले...
छा न स्वप्न पडावे
न वीन नवीन काहीतरी पहावे
घा लमेल त्यासाठीच होत होती
ल य झोपेची काही साधत नव्हती....
उ शाला घड्याळ टिक टिक करत होते
या ना त्या कारणाने मन विचलित होते
म्हंटले हे असे किती दिवस
शेवटी डोळा लागला....
सुख स्वप्नात इतका रमलो
जाग येता वय विसरलो
ताजे तवाने मन घेऊन बाहेर पडलो
तो लागलीच वर आला...
आणि म्हणाला
सुप्रभात....!