शुभ विवाह
शुभ विवाह
1 min
146
मुहूर्त अचानक ठरला
बैठक बसली बोलणीसाठी
भ्यालेलें चेहरे सगळे
घास गळ्याखाली उतरेना
प्रसंग होता मंगलमय तो
सारूनि चिंता साऱ्या विवंचना
एकमताने ठरला विवाह दिन
झोपी गेलो तरी विचार थांबेना
आनंद होता बंधू विवाहाचा
दारी आम्रपत्रे माळा लागली
डुलत होते तोरण केशरी
नाते मंडळी घरी जमली
होता आत्मविश्वास बहु
पाडू सुखरूप कार्य हे
जेथे साथ लाभते परिवाराची
तेथे असफल काही राहे
सोहळा आनंदाचा वधूवराचा
आशीर्वाद थोरा मोठ्यांच्या
डोइवर पडल्या अक्षता
सुखी रहावे दाम्पत्याने आशा मनाच्या
क्षण होता तो सर्वोत्तम
सर्व कुटुंबीयांनी केलें पूर्ण
जेथे असतो परमेश्वर साक्षी
कार्य कां राहते कधी अपूर्ण
