शुभ दिपावली आली गड्यानो
शुभ दिपावली आली गड्यानो
1 min
296
मंगलमय दिवस उजाडला
दारी तोरण बांधू या
अंधाराला पार करुनी
एका मनाने नांदू या
समाजसेवेचे वृत्त आमुचे
बहुजनांचा कैवारी
शुभ दिपावली आली गड्यांनो
पणती लावू दारी...
ज्योत पेेटवून ज्योतीला
प्रकाश तुम्हाला देवू
या मातीचे ऋण फेडण्याचे
वचन सगळे घेऊ...
सुखी हसावे दारामध्ये
उजळून जावया ज्योती
म्हणून यावा माणसासाठी
जुळवून यावी नाती...
तुम्ही आमुचे, आम्ही तुुमचेे
नाते अबाधित रहावे
दिपावलीच्या शुभदिनी
मनात दिवे लावतो...
