श्रम एक भूषण
श्रम एक भूषण
1 min
357
उद्योगाचे घरी नेहमी
लक्ष्मीदेवता वसतसे
चालणारे हात नेहमी
स्वाभिमाने जगतसे
कष्टाची पिठलं भाकरी
पुरेपूर समाधान देई
कष्टाचे मी खातो म्हणून
सुखाने ढेकर देई
स्वाभिमान जपतसे
प्रत्येकाची श्रमशक्ती
कमवूनी खातो सुखाने
शांत येई निद्रा त्यासी
धट्टीकट्टी गरीबी अन्
मानाचे हे जिणे
नको कुणाची हांजी हांजी
नसे त्यास काही उणे
