श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?
श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?


श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?
नऊ महिने पोटी सांभाळून जन्म देणाऱ्या देवकी मातेचा तान्हा की आपले दुध पाजवून वाढवणाऱ्या यशोदा मैयाचा कान्हा..?
श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?
भर पावसात यमुनेच्या पुरात मथुरेतून गोकुळात घेऊन जाणारा वासुदेव बाबांचा की गोकुळात सांभाळ करणाऱ्या नंद बाबांचा..?
श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?
यमुनेच्या डोहात चेंडूसाठी उतरवणाऱ्या सवंगड्यांचा का दही दुधाच्या हंड्या फोडून त्यांना खाऊ घालणाऱ्या गरीब मित्रांचा..?
श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?
दिवसभर रानात भटकून चरणाऱ्या गायी वासरांचा की गोकुळातील प्रेम करणाऱ्या त्या गोप-गोपिकांचा..?
श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?
जीवनभर प्रेमिका बनुन राहणाऱ्या वत्सल राधेचा की सुवर्णतुला करतांनी मंजीरा देणाऱ्या पवित्र तुळशीचा..?
>
श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?
स्वर्गातील पारिजातक वृक्षासाठी रुसणाऱ्या रुक्मिणीचा की न मागताच वृक्ष मिळणाऱ्या सत्यभामेचा..?
श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?
बंदिवासातून मुक्त केलेल्या सोळा हजार एकशे महिलांचा की वस्त्रहरण होतांना वस्त्र पुरवणाऱ्या द्रोपदी बहिणीचा..?
श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?
मूठभर पोह्यांसाठी सुवर्णाचे गाव देणाऱ्या गरीब सुदामाचा की रणभूमीत युद्ध करणाऱ्या त्या वीर अर्जुनाचा..?
श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?
जीवनभर भक्ती रंगात न्हाऊन निघणार्या त्या मीराबाईंचा की जीवन अर्पण करणाऱ्या कवी सुरदासांचा..?
श्रीकृष्ण सखा सांगा कोणाचा..?
श्रीकृष्ण सखा.. हा सर्वांचा.. माझा.. तुमचा.. आपल्या सर्वांचा..!
श्रीकृष्ण सखा.. हा सर्वांचा.. माझा.. तुमचा.. आपल्या सर्वांचा..!