STORYMIRROR

Manisha Potdar

Others

4  

Manisha Potdar

Others

श्रध्दा असु दे

श्रध्दा असु दे

1 min
161

शुद्ध शुध्द मनं तुझं शुद्ध असु दे

बुद्ध बुद्ध मनी तुझ्या बुध्द वसु दे

प्रारब्ध तुझ्या कपाळी, सत्कर्म तुझ्या जिव्हाळी

दिर्घ वसु दे,दिर्घ वसु दे

श्रध्दा असु दे, अंधश्रद्धा नसु दे ॥ १ ॥


कृष्ण कृष्ण मनं तुझं कृष्ण असु दे

कृष्ण कृष्ण मनी तुझ्या कृष्ण वसु दे

प्रारब्ध तुझ्या हाती, कर्तव्य तुझ्या माथी

दिर्घ वसु दे, दिर्घ वसु दे

श्रध्दाअसु दे , अंधश्रध्दा नसु दे ॥ २ ॥


शक्ती शक्ती मनं तुझं शक्ती असु दे

शक्ती शक्ती मनगटात शक्ती वसु दे

शास्र तुझ्या माथी, शस्त्र तुझ्या हाती

दिर्घ वसु दे, दिर्घ वसु दे

श्रध्दाअसु दे, अंधश्रध्दा नसु दे ॥३ ॥


भक्ती भक्ती मनी तुझ्या भक्ती असु दे

सेवा सेवा भुमीची सेवा घडू दे

शांती तुझ्या मनी, क्रांती तुझ्या ध्यानी

दिर्घ वसु दे, दिर्घ वसु दे

श्रध्दा असु दे , अंधश्रध्दा नसु दे ॥ ४ ॥


राम राम मनी तुझ्या राम असु दे

काम काम हाती तुझ्या काम असु दे

धान्य तुझ्या हाती, स्वास्थ्य तुझ्या मनी

दिर्घ वसु दे, दिर्घ वसु दे

श्रध्दा असु दे, अंधश्रध्दा नसु दे

शुध्द शुध्द मनं तुझं शुध्द असु दे

श्रध्दा असु दे, अंधश्रध्दा नसु दे ॥ ५ ॥


Rate this content
Log in