श्रावणमास
श्रावणमास
रणरणत ऊन सरलं आता हवेत गारवा आला
लगबग ही सूरू झाली आता श्रावणमास आला
किलबिल पक्ष्याची एकच धांदल उडाली
श्रावनाच्या आगमनाने वसुंधरा आनंदली
नाचू लागले आनंदाने रानी थुई थुई मोर
गल्ली, बोळा, अंगण ओले गिरक्या घेती पोर
तहानलेली धरा कशी ही तृप्त बघा झाली
सासुरवाशीन लेक जशी माहेरा आली
पाने सजली दवबिंदूनी जणू अमृत मोती
लवलवती मग बघा कशी ती वायुसंग पाती
कळ्या उमलती फुले बहरती पाखरू भिरभीरती
शालू नेसून हिरवाईचा जणू दिसें नवंवधू धरती
या वेलीतून त्या वेलिवर पक्षी झुलती फिरती
इंद्रधनु ही पाही गम्मत नभातून वरती
श्रावणाची श्रावणसर ही चिंब भिजवून जाई
वेड्या मनाची बंद कवाडे अलगद उघडून देई
