श्रावण सोमवार सांज...!
श्रावण सोमवार सांज...!
समय हर हर महादेव...!!""
हा श्रावण महिना
श्रा वण सरींनी चिंब चिंब
व र वरच्या जल धारांनी
न कळत भिजवत आहे...!
सो डली छत्री मी घरी
म ज ती आता आठवत आहे
वा ताहत होता मला वाटते
र डण्याची वेळ मज वर येत आहे...!
सां गितले मज होते तिने(पत्नीने)
ज रा आवाज वाढवून त्याने(मुलाने)
स गळेच कोठे ऐकायचे म्हणुनी
म न मारून मी सारे ताडले...!
य डा समजुनी वाटते
ह सण्यावर बोळवण सहज झाली
र डण्याचीच कशी पहा
ह सतमुखाने पाळी मजवर आली...!
र स्ता चूकला त्यात अचानक
म ला कळलेही नाही
हा खेळ त्या महादेवाचा
दे ऊन त्रास तो आज खेळवी...!
व र आणखी म्हणे मज
बोल एकदा जीवनी
हर हर महादेव बाबा
पहिल्या तरी श्रावण सोमवारी...!!
