शोध
शोध


शोध घे तू स्वत:चा, संकटावर करुन मात
बरोबर येवोत कोणी ना कोणी देवोत साथ
फेकून दे ती चादर काळी व्यर्थ अनामिक भितीची
जरतारी ती शाल पांघर आत्मविश्वासी किनारीची
येतील वादळे भरमसाठ अडचणींची त्सुनामी लाट
न घाबरता न डगमगता किना-यासारखी तू रहा ताठ
नियतीच्या क्रूर हातांचा पडेल गळ्या भोवती फास
तुला बंधनात जखडण्याचा समाज पुरुषाचा खेळ खास
विकृत विषारी नजरांचे हालाहल तू पिवून जा
अपयशाला रोज हुलकावत यशाला तू जिंकत जा
अस्तित्वाच्या तेजाने चमकता ओवाळतील हे ग्रह तारे
यशाला मग तुझ्या कुरवाळतील बघ सारे.