शोध "मी" चा
शोध "मी" चा

1 min

11.4K
शोध "मी" चा
शोध तू स्वतःला
का घेतेस कुणाचा
आधार आता
अस्तित्वाचा तुझा
प्रश्न आहे ग आता
बस कर आता हे
एकटेपणात रडणे
बस कर आता
अंधारात स्वतःला शोधणे
खूप झाला ग आता
उठ आणि उभी हो
आहे तुझ्यात हिम्मत
आज तू पोळशील ग
बरसणाऱ्या धो धो पावसात
आज तू भिजाशिल
आज सहन
तू सर्व काही कर
तेव्हाच तू खंबीरपणाने
उद्या तोंड देशील
उठ आणि लढ
आरशात स्वतःचा
चेहरा बघशील
रोज तुझा तुला
एक नवा चेहरा
एक नवीनआव्हान देईल