Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangieta Devkar

Romance

3  

Sangieta Devkar

Romance

सहजच..!!

सहजच..!!

1 min
11.2K

हाय हॅलो ने सुरू झालेल्या त्या,

आपल्या मोबाईलवरील गप्पा

लाइक्स, कमेंट आणि बरंच काही,

आठवणीचा बनला तो सुखद कप्पा

छानच जुळले होते आपले सूर,

भले भिन्न असले स्वभाव

ऑनलाईन मात्र गजबजून जातो मैत्रीचा गाव

ओळखी अनोळखी इथे एकाच रंगात रंगून जातात

रोजच ऑन लाइन एकमेकांची वाट बघत बसतात

कोणी म्हणतं आभासी जग हे,

इथे नाही तुमच्या भावनेची कदर

आभासी तर आभासी, थोडे जगुया ना बेफिकर

तू कायमच सगळं बोलायचास सहजच,

बोलणं तुझं हसणं तुझं मनात रुतून बसले कायमचंच

माहीत नव्हते रे या मोबाईलच्या गप्पा अशा भुलवतात

अचानक बोलणं बंद केलेस, मी विचारले काय झाले?

तू नेहमी सारखाच म्हणालास काही नाही सहजच

पण मी मात्र गुंतले होते तुझ्यात, अगदी सहजच.!!

Rate this content
Log in