शिशीर ऋतू
शिशीर ऋतू
1 min
420
शिशीराची थंडी आणते , अंगावर शिरशिरी ।
मनी माझ्या काहूर दाटे, उठली का भिरभिरी॥
हेमंताचे वैभव सरले, पानगळ उरली ।
धुळीची वादळे उठवीत चोही दिशा भरली॥
जीर्ण पर्ण ते उडवून लावीत , येती शीत लाटा।
वृक्षराज तो बहर उतरुनी , धरी निष्पर्ण काटा ॥
हा संन्यास म्हणायचे, की विजयामागून हार ?
तांडवनृत्य करता शिवशंकर , करिती का विश्वसंहार ?
हिमालयातील हिम वितळले, गंगाही गोठली ।
दुर्जन होती भस्मिभूत, चिंगारीतून आग नवी पेटली॥
पानगळीतून वसंत फुलतो, नवसृष्टीचे सृजन ।
मनातले काहूर भिरकावीत, शिशीर करी गमन॥
