STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Children Stories Comedy Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Children Stories Comedy Inspirational

शिक्षण देणार...

शिक्षण देणार...

1 min
0

साऱ्यांना शिक्षण देणार..

 आम्ही गोंधळ, गोंधळ, गोंधळ गाणार अन् साऱ्यांना शिक्षण देणार...१

 नाही अडाणी कोणी राहायचं शिक्षण साऱ्यांनी बघा घ्यायचं..२

 त्यासाठी तर शाळेत जायचं अन् साऱ्यांनी लिहा वाचायचं नाही अडाणी कोणी च राहणार...२

 नका अडाणी कोणी राहू सारे शिकून शहाणं होऊ..२

 मुलामुलींना शिक्षणाचा तो मार्ग आपण दावू अंधश्रद्धा नी अज्ञान दूर सारंच होणार...३

 खेड्यापाड्यात आली शाळा आहे ज्ञान हा तिसरा डोळा..२

 मुलामुलींना शाळेत पाठवा फुलवू ज्ञानाचा आपण मळा साऱ्या देशाचं या कल्याण होणार...४

 चला चला हो शाळेत जाऊ आपण इंग्लिश च शिक्षण घेऊ
 दुनिया गेली ही कुठल्या कुठं चला आपण ही पुढं जाऊ भलं देशाचं होणार...५

 गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड


Rate this content
Log in