शिक्षक
शिक्षक
1 min
215
ईश्वरासमान शिक्षक असतात
देतात जीवनाला आकार।
मार्गदर्शक विद्यार्थ्यांचे असती
करतात त्यांचे स्वप्न साकार।
चिमुकल्या पंखात
बळ ते देतात।
उंच गगन भरारी
घ्यायला शिकवतात।
संस्कार गुरुचे करी आत्मसात
आव्हान पेलण्या गुरुची मदत।
शिक्षक तुमचे मी मानतो आभार
नेहमी पुढे शिकविण्या विद्यार्थ्यास मदतीचा हात।
