शिक्षक
शिक्षक
1 min
223
खडू तुमच्या हातात नेहमी
सुंदर असते अक्षर।
शिकून धडा आम्हाला
करता तुम्ही साक्षर।
मारत असता कधी कधी
हातावर आमच्या छडी।
तेव्हाच शिकतो मी
जोडाक्षरे वेवेगळी।
करतो वंदन तुम्हाला
चरणी ठेऊन माथा ।
तुम्हीच शिकवली सर आम्हाला
ज्ञानातून आयुष्याची कथा
