शिक्षिका
शिक्षिका

1 min

311
माझ्या आठवणीत शिक्षिका
आहे मराठीच्या जोशी बाई..!!
मजवर केले अक्षर शिंपण
जणू माझी प्रेमळ आई..!!
कवितेचा "क" शिकवताना
कल्पनेच्या पावसात नेले..!!
वेचताना शब्द मोती
चिंब ओली मी झाले..!!
डोंगर रांगा फिरताना
भेटले नदी आणि नाले..!!
फुलांच्या रक्षणास उभे मोठे
मी पाहिले काट्याचे भाले..!!
व्हायचा प्रवास रोजचा
वेगवेगळ्या अशा विषयात..!!
शिकताना व्हायची फेरी
अलवार निसर्गाच्या गावात..!!
आज आठवताना ते दिवस
मन आनंदाने भरते..!!
गतकाळ घेऊन ओंजळीत
माझे बालपण मी स्मरते..!!