STORYMIRROR

Prashant Kadam

Others

4  

Prashant Kadam

Others

शिकेन मी !

शिकेन मी !

1 min
41.4K


शिकेन मी

सांगू कसे सख्या तूला

वाचता नाही येत मला

तूझे पत्र मिळाले मला

वाचू कसे सांग मला


नाही कधी शाळेत गेली

नाही कधी काही शिकली

आता खरच खात्री पटली

शिक्षणा विना मी फसली


आठवून आता उपयोग काय

मन हेलावून फायदा काय

तुझ्या पत्राचे करू काय

सांग मी वाचू कस काय


माझीच मला वाटते लाज

शिक्षणाचाच तर खरा साज

चुकी दुरूस्त जरूर करीन

आता शिक्षण सुरू करीन


वाचता जेंव्हा येईल मला

सुख लागेल माझ्या मनाला

स्वःताच वाचेन तुझ्या पत्राला

चैन पडेल तेंव्हाच जीवाला


कसे सांगू सख्या तूला

जेंव्हा शिकेन मी शाळा

वाचून तूझ्या पत्राला

उत्तर देईन तूझ्या प्रेमाला


Rate this content
Log in