STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

शीर्षक उसळलेला दर्या

शीर्षक उसळलेला दर्या

1 min
227

गर्द हिरवाई दाटे

खुले निसर्ग सागरी

उसळती लाटा वेगे

भेटी अधीर अंबरी   (1)


ताड माड उंच वाढे

डुले नारळ , पोफळी

काजू , सुपारी डौलात

शोभा आगळीवेगळी  (2)


भरतीची मजा न्यारी

लाटा वेगे उसळती

सुख दाटे गळाभेटी

चिंब नवथर प्रीती   (3)


बोट सागर कुशीत

येती प्रेमिक खुशीत

कुजबुज गे मिठीत

गोड तुषार शिंपीत   (4)


उंच स्वैर विहरावे

निळाईला निरखावे

येता अंबर कवेत

मन तृप्तीत नहावे   (5)


रविबिंब क्षितीजाशी

रत्नाकर आरक्तसा

मीलनासी अधिरसा

धुंद होय मदीरसा  (6)


Rate this content
Log in