शीर्षक पेरणी पुण्याची
शीर्षक पेरणी पुण्याची


जीवनाच्या भूमीमधे
करा पेरणी पुण्याची
रोपे लावा सत्कर्मांची
रास उगवे दुव्यांची (1)
संकटात कोणी असे
घास घासातला द्यावा
कोणी पुरात अडके
हात मदतीचा द्यावा (2)
विश्वामधे रोगराई
जनसेवा मौल्यवान
नर्स डॉक्टर पोलिस
देवदूत हे महान (3)
कधी महापूर येई
कधी अतीवृष्टी होई
कधी कोरडा दुष्काळ
दशा अन्नानचि होई (4)
माणूसकी फार मोठी
नित्य असावी मनात
जन्म लावावा सार्थकी
ठसा जनमानसात (5)
पेरा पुण्य वारेमाप
नाही पुण्याची मोजणी
लेखाजोखा चित्रगुप्त
लिहे नित्य वहीमधी (6)
चांगलेच पेरते व्हा
उगवेल सोन्याचेच
संचयच पुण्याईचा
नेई मोक्षमार्गाप्रत (7)