Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Others

4.5  

Manisha Awekar

Others

शीर्षक गर्जा महाराष्ट्र

शीर्षक गर्जा महाराष्ट्र

1 min
23.6K


सह्याद्रीतील सह्यकड्यांचे , मराठमोळे वीर 

देशरक्षणा प्राणपणाने ,

तळहातावर शीर  (1)


शूर शिवाजी अन् छाव्याची ,

परंपरा योद्ध्यांची

पेशवाईची रामशास्त्रींची ,

कर्तबगारी साची   (2)


टिळक गोखले सावरकर नि 

बाबू गेनू थोर 

भारतमाता मुक्त कराया , सोडियले संसार   (3)


भूमी आमुची मराठमोळी ,

संगीतकलासक्त

आशा लता ग दि मा नि रविवर्मा भक्त    (4)


अभंगातही थोर साधना , ज्ञाना तुकयांची

एकनाथी भारुडे नि आर्या मयूरपंतांची    (5)


वारक-यांची परंपरा ही , 

भक्तिमार्गास लाभली 

पंढरीच्या विठूरायापायी ,

भावभक्ती लोटली  (6)


लोकधारा महाराष्ट्राची , लावणी गण गौळण

लोकनाट्य नि कथा गजाली,

कर्णमधुर कीर्तन   (7)


साहित्यगंध दरवळे येथला , अवघ्या विश्वात 

बहिणाबाई शांताबाई , पु ल 

वा रा कांत    (8)


स्त्रियाही प्रगतीपथावर , 

राष्ट्रपतीपद भूषविले

फुले नि कर्वे दांपत्यांनी ,

ज्ञानामृत दिधले   (9)


खाद्यसंस्कृती विपुल इथली ,

परदेशी संतुष्ट 

पुरणपोळी नि मोदकांकडे , 

होती आकृष्ट     (10)


विज्ञानातही पाऊल पुढचे ,

नारळीकर माशेलकरांचे

सावरकर नि आंबेडकर हे ,

तुरेच शिरपेचाचे   (11)


प्रगतीशील महाराष्ट्र , तंत्रज्ञानातही अग्रेसर

गर्जतो कीर्तीचा डंका , परदेशी दूरवर    (12)


तैलबुद्धिचे महाराष्ट्रीय , 

नाठाळांस असे काठी 

हेकट तसेच मधुरही ,

भल्यांस देती लंगोटी  (13)


महाराष्ट्राची संस्कृती माझ्या , असे शब्दातीत

अल्पमती मी केला यत्न ,

काव्यबंधनात   (14)


Rate this content
Log in