शीर्षक असे जगा भरभरुन जीवन
शीर्षक असे जगा भरभरुन जीवन
जरा , वार्धक्य ह्यांना
का बरे घाबरायचे ?
खुबीने रहस्य जाणून
आनंदाने जगायचे (1)
पोक्तपणी अनुभवाचा
गाढा साठा असतो
विचारल्यावरच नेहमी
सल्ला द्यायचा असतो (2)
व्यायाम, मिताहाराने
समतोल साधायचा
शरीराला योगानेच
लवचिकपणा द्यायचा (3)
वाचायचं,ऐकायचं
मनसोक्त भटकायचं
वर्तुळाच्या परीघात
अगदी खूष रहायचं (4)
मित्रमंडळीत रमायचं
विनोद , गप्पांत हसायचं
सर्वांना एकत्र करुन
आठवणीत रमायचं (5)
पैलतीर दिसला तरी
विचलित व्हायचं नाही
अध्यात्माची साथ
कधी सोडायची नाही (6)
असे आपले जीवन
भरभरुन जगायचं
स्वतः आनंदी राहून
दुस-यांनाही ठेवायचं (7)
