शीर्षक आठवांची पायवाट
शीर्षक आठवांची पायवाट
1 min
46
पायवाट वळणांची
रुळलेली गावाकडे
आठवांचा ठेवा गोड
मनोमनी जपला गे (1)
सुट्टी लागता जातसे
पायवाटे वरुनीया
घाई मायच्या भेटीची
झपाझपा चालोनिया (2)
गर्द रानमळ्यातूनी
सरे पायवाट पुढे
धावे मोट बैलांसंगे
नसे पाण्यालागी उणे (3)
हरबरा बहरला
ठेवी घाटे हातावरी
मिठी मारी सखुमाई
जीव भरुनिया येई (4)
पायवाट सरतसे
नुमजेना भराभरा
वाट पाहते माऊली
उभी घराच्या दाराला
