शीर्षक आला पाऊस
शीर्षक आला पाऊस
1 min
36
तप्त वसुंधरेवरी
थेंब थेंब वळीवाचे
दरवळे मृदगंध
आगमन पावसाचे
वर्षा हर्षत गर्जत
धुवाधार बरसते
परिसर चैतन्याचा
लतावृक्ष तेजाळते
ओथंबती जलधारा
मेघराज हवा हवा
स्वागतास वसुंधरा
हिरवाई साज नवा
मोदे वर्षा आगमने
कृषीवल मनोमनी
शेतामधी पिकतील
मोती लडीलडीतूनी
सोनसळी हिरवाई
रश्मीप्रभा हळदुली
इंद्रधनू सप्तरंगी
वसुंधरा सुखावली
