शीर्षक आला आला आषाढ
शीर्षक आला आला आषाढ

1 min

119
घननीळ नभी दाटे
आली आषाढाची झड
सरसर वेगे वेगे
तिला नसेनाच खळ
हिरवाई चहूकडे
सृष्टी बहरासी येते
वस्त्रे हिरवी लेऊनी
लाज लाजूनी हसते
असे आषाढ मासाला
थोर कालिदास मान
मेघ दूत होऊनिया
निरोपाचे करी काम
आला आषाढाचा मास
लेकी मना लागे आस
भाऊराया कधी येई
वाट बघे त्याची खास
आई आषाढ तळते
लेक आली माहेरास
गप्पा खेळात रंगते
भर येई आनंदास
असा आषाढ आनंदे
येतो झरझर वेगे
सुखवितो सृष्टीलागी
मोदवितो मनालागे