STORYMIRROR

Medha Desai

Others

3  

Medha Desai

Others

शेतीप्रधान भारत

शेतीप्रधान भारत

1 min
430

आपल्या शेतीप्रधान भारत देशात

जगाचा पोशिंदाच आहे भुकेला

खेडोपाडी आता ग्रामीण भागात

तंत्रज्ञान धावून आले सर्वांच्या हाकेला १


शिक्षणाची भक्कम कास धरून

ग्रामीण भारत आहे सुधारलेला

सावित्रीबाईंची आठवण ठेवून

दिव्य यशकीर्तीने पुढारलेला   २


तरीही रूढी,परंपरा,अंधश्रद्धा

पावलोपावली घेऊन बसलेला

पुरूषप्रधान संस्कृतीतून आता

स्त्रियांचा अनादर सारीकडे ठसलेला ३


नवनवीन शोध लागल्यावर

विज्ञानाचा,तंत्रज्ञानाचा ठसा उमटलेला

ग्रामीण भारत असला तरीही

अव्वल शेतीच्या हिरवाईतून एकवटलेला ४


बळीराजा इथे राबराब राबतो

माय मराठीच्या समृद्ध मातीसाठी

ग्रामीण असला तरी माणूसच असतो

पोट भरण्याच्या नित्य संस्कृतीसाठी ५


ग्रामीण भारत सुखसुविधांचा

नवीन तंत्रज्ञानाने भारावलेला

जगाच्या पाठीवर यशोशिखर गाठून

शेतीमाती, खळखळणार्या पाण्याने बहरलेला ६


Rate this content
Log in