शेकोटी
शेकोटी
1 min
270
माझे हृदय ह्या इथे आज
आहे विस्तवा सम जळते
सांग भगवंता असे करून
तुला काय बरे मिळते
पेटती निखारे या मनात
नियतीचा हा घाव पाहुनी
सोसतो सर्व दुःख आम्ही
उघड्यावरी नित्य राहुनी
येता थंडी ,वादळ ,पाऊस
राहतो झाडा ,भिंतीचा आडोशी
बनवायचे स्वतःला इतके कणखर
हसत जगायचं ,जरी वाटले रडोशी
येऊ दे कितीही संकटे आम्हावर
तरीही आम्ही त्यांच्याशी लढणार
स्वतःच अस्तित्व इथल्या अग्नीत
सोन्यागत तळपवून काढणार
आनंद वाटत हिंडू या जगी
हसत जगू आम्ही दुःख सोसूनी
पडता हिम समाजात द्वेषाचे
शेकू प्रेमाच्या शेकोटी जवळ बसूनी
