शब्दांची किमया
शब्दांची किमया
1 min
182
शब्द तारी शब्द मारी
शब्दांची किमया न्यारी।।
शब्द जोडी शब्द तोडी नाती ही सारी
शब्द आवरी शब्द सावरी।।
शब्दांचा नको पसारा
उच्चारतांना जीभ आवरा।।
शब्द उगवती सूड, शब्द असे प्रेमाचे मूळ
शब्दांची नको पडझड, शब्दानेच मिळते बळ।।
शब्दांचा हा खेळ सारा, शब्दांचा हवा सहारा
शब्दांत हवा गंध प्यारा, नका देवू द्वेष भावनेला थारा।।
