शब्दांची दुनिया
शब्दांची दुनिया
1 min
265
शब्दांची किमया न्यारी
असे त्यांची दुनिया साजरी।।
सुमने होऊन कधी बरसती
कधी काटे होऊन टोचती।।
शब्दांना नसावा अहंकाराचा स्पर्ष
बोलताना, ऐकताना असावा हर्ष।।
शब्द देती भावनांना आकार
प्रत्येक स्वप्न करी साकार।।
शब्द उच्चारताना असावे भान
शब्दानेच मिळतो भाषेला मान।।
