STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

शब्द

शब्द

1 min
236

शब्दातील गोडवा

अनुभवावा कितीदा

नेहमीच ऐकावा

' अहो ' हजारदा


आई - बाबा मामा - मामी

शब्द जोडी घराण्याला

मित्र - मैत्रीणी सगे - सोयरे

अर्थ आणती जिवनाला


मराठीच्या या भाषेत

अपुलकी सदा वाटे 

गुजगोष्टी आजीच्या

अंगाई कुशीतच भेटे


घरी दारी सर्वत्र

ऐकतो शब्दांची मधुरता

कधी ना संपे ओढ

भाषेत किती तरलता


मराठी असे आमुची

मायबोली जीवापाड

फडके तीचा झेंडा

पहा असा अटकेपार


Rate this content
Log in