शब्द
शब्द
1 min
196
शब्द सखा माझा
शब्द आधार जगण्याचा
शब्द साकार करी स्वप्न
शब्द जागवी मन
शब्द कधी हसवतात
कधी रडवतात
मनातील भावना तेच सांगतात
शब्द प्रेम देती
शब्द शक्ति देती
शब्द जगण्यास अर्थ देती
शब्दानेच मिळते ओळख
शब्दच देती दमलेल्या मनास सुख
शब्दानेच व्यक्त होते दुःख
शब्द मोठे करामती
त्याचे अर्थ वेगळे निघती
शब्दच आहेत खरे सोबती
