STORYMIRROR

Nutan Pattil

Others

2  

Nutan Pattil

Others

शब्द

शब्द

1 min
68

शब्दातून व्यक्त होताना

हदय दाटून आले!!

मनी भावना उमटल्या

नयनी अश्रू वाहू लागले!!


शब्द पण मुके झाले

बोलू लागली लेखणी!!

एक एक मोती सांडू लागला

शब्दांची किमया देखणी!!


भावनांना वाट मिळाली

शब्द होऊ लागले मोकळे!!

कसा याला आवर घालू

मज नाही काही कळे!!


सुखाची झालर दुःखाचे सावट

मनी नानावीध कल्पना!!

व्यक्त होऊ लागले सर्व

शब्द करी सांत्वना!!


विसरून गेले सर्वकाही

शब्दातून व्यक्त होताना!!

इंद्रसभा जशी भरली

स्वर्गसुखाची भावना!!


Rate this content
Log in