STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

शब्द जीवनी

शब्द जीवनी

1 min
204

शब्दांतूनची जीवन , छोट्या सोनुल्याला

गप्पा असती बोलबोबड्या , खेळवी बाललीलांना


नाते उमजे बाळाला , सोप्या शब्दांमधी

खेळ गप्पा बालपण , अल्लड शब्दांमधी


शाळा येता शिस्त उमजे , खेळ खेळता मजा उमजे

बालपणीचा काळ सुखाचा , दोस्त मैत्रीमधे मन रमे


पुढील वळण तारुण्याचे , तन मन बहरविण्याचे

प्रेम भाव संवेदना , शब्दांवाचून उमजण्याचे


गाडी वळणे घेत जाता , बिकट वाट वहिवाट

सुखदुःखामधी निकटच्या , शब्दांची लाभे साथ


कांचनसंध्या उमले तेव्हा , साथ समजुतीची

हाती हात घेऊनी , आधार शब्द सोबती


गेला शब्द पुन्हा न मागुती , येत बाणापरि

शब्द शब्द जपून ठेवा , बकुळ फुलापरि


असे शब्द जीवननामधी , नित्य साथ करती

शब्दवैभव भव्य दिव्य , जीवन साकारती


Rate this content
Log in