STORYMIRROR

Chandan Pawar

Others

4  

Chandan Pawar

Others

शाळा...

शाळा...

1 min
60

   दगड वीट वाळू मातीची

 नुसती भिंत नसते शाळा..

जीवनाला आकार देणारी

संस्कारपीठ असते शाळा ...


         विविध उपक्रम-स्पर्धातून

         ज्ञानाचा राजमार्ग दाखवते...

         गणिती- भाषिक क्रियांसह

         सर्वांगीण गुणवत्ताविकास करते... 

   

जिद्द- चिकाटी- मेहनतीची

भावना वाढीस लावते...

धम्माल, मज्जा व खोड्यांची

शाळा अनोखी पर्वणी असते...


          शाळा नुसती शाळा नसते

          तर अमृताचा घडा असतो..

          चिमणी पाखरांचा किलबिल     

          करणारा रानमेवा असतो...

 

शाळा गुरू, शाळा कल्पतरू

शाळा जीवन सांधत जाते..

आनंददायी शिक्षणाभूतीतून

व्यक्तिमत्त्व विकास साधते...


Rate this content
Log in