शाळा
शाळा
आजही शाळा आठवली की आठवतं ते बालपण
दंगा मस्ती खोड्या मित्र-मैत्रिणी आणि ते आपलेपण☺️
शाळेच्या पहिल्या दिवसाची मज्जाच वेगळी असायची
सव॔ काही नवीन नवीन अशी गोष्ट सगळी असायची
विषय जरी निबंधाचा असला तरी
कवितेच्या माध्यमातून मांडायचा होता कारण
आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, जडणघडणीसाठी
अनमोल वाटा हा तर शाळेचाच होता
पहिला दिवस शाळेचा सदैव
आठवणीत राहणारा
पहिल्या जागेसाठी धडपडायचा
दप्तर, पेन्सिल आणि दुहेरी रेषांची
वही सोबत
गृहपाठ असायचा नेहमीचा😇
रोज सकाळी प्रार्थनेला हजर राहून
खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणणे🧍🧍♀️
खेळाच्या तासाला एका रांगेतून जाणे
अन परत येताना मैत्रिणीच्या खोड्या काढणे😘😊
तास संपले की मधल्या सुट्टीत डब्बा खाणे आणि धावत मैदानावर जाणे
असा नित्य दिनक्रम असायचा
दंगामस्ती खुप असायची पण शिस्त मात्र दिसायची
परीक्षे नंतर येणाऱ्या सुट्टीची मजा व सुट्टीत दिलेल्या अभ्यासाची सजा असायची😌
खूप खेळ असायचे शाळेमध्ये
गॅदरिंग म्हणजे धमाल असायची
निरनिराळ्या पोशाखांमध्ये
नृत्य, नाटक
मजाच ती वेगळीच असायची
शाळेला मनामध्ये एक वेगळे स्थान आहे
शिक्षक शिक्षिका हेच प्रेरणास्थान आहे
धावपळीच्या जीवनापेक्षा बालपणीची शाळा बरी होती
अज्ञान अंधकार मिटावा, ज्ञान सागर सर्वांना भेटावा यासाठी
काळ्याकुट्ट फळ्यावर पांढऱ्या खडूने जशी सर्वांची भविष्य लिहिली गेली होती
शाळेचे ते दिवस आठवले की उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं
शाळा आयुष्यातला महत्वाचा भाग हे आपल्याला आयुष्यातून संपला तेव्हा कळायला लागतं
शाळा एक अविस्मरणीय अशी आठवण
प्रत्येकानेच आपल्या आयुष्यात करून ठेवली
मनाच्या गाभार्यात आपल्या शाळेची कुठेतरी साठवण ...😊
