शाबूत भू ती माझी
शाबूत भू ती माझी


कोवळी ती किरणं बहरली,
पावसात चिंब जाहली,
जणू ह्या मंजुषेतूनी,
धनु रंग पसरली.
गांडीव तो अर्जुनाचा,
धनुष्य तो शिवाचा,
रतीस स्पर्श करुनिया,
क्षण इंद्राच्या मोहाचा.
मज आस स्वातंत्र्याची,
पराजय-मुक्त व्हावे,
ह्या भूमीने तरच मजला,
धारातीर्थी पाहावे.
भूमीवर आच्छादित,
बालिश अट्टहास,
माझा तर फक्त आहे,
शाबूत भू चा ध्यास.