STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

*शाबासकी गुरुजींची*

*शाबासकी गुरुजींची*

1 min
15.4K


चला मुलांनो आज

घेवूया शाबासकी गुरूजींची

शाळेत जावूनी

गृहपाठ म्हणोनी

मन जिंकूया गुरूजींचे

चला मुलांनो आज....॥१॥


वर्गात जावू आनंदाने गावू

अध्ययनही शांततेत करु

गुरूजींचे मन जपू..

चला मुलांना आज....॥२॥


मैदानी जावू,खेळही खेळू

योगा,प्राणायामही करू

सूर्यनमस्कारही घालू

चला मुलांनो आज....॥३॥


उपक्रम ते छान करू

प्रकल्प सादर करु

गुरूजींचे सर्व ऐकू

चला मुलांनो आज....॥४॥


नवनिर्मिला प्राधान्य देवू

परीक्षेत उत्तम गुण मिळवू

सर्वांचीच शाबासकी घेवू

चला मुलांनो आज... ॥५॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन