STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

सगुकरवर!

सगुकरवर!

1 min
27.2K


शुक्रवार मंगल मय होवू दे

तेजोमय होऊ दे ...!!!


शु चिर्भूत होउनी सकाळी सकाळी

क्र माक्रमाने एक एक सत्कर्म

वा त निलांजलाची लावून

र म्य स्वप्न पूर्तीसाठी आरंभिले


मं तरलेल्या प्रत्येक क्षणांचा

ग ठ्ठा हाताशी धरून

ल य जीवनाची अधोरेखित करावी

म जल दरमजल करीत करीत

य दा यदाही म्हणत सात्विकतेने.


हो मकुंड कर्तृत्वाचा प्रज्वलित करावा

ऊ तुंग उज्वल ध्येय सिद्धीसाठी

दे दणादण कर्मयोग अंगीकारूनी


ते हत्तीस कोटी देवांचे क्षणभर स्मरण करावे

जो जे वांच्छील तो ते लाभोचा आशीर्वाद

म नापासून देणाऱ्या माऊलीस

य शासाठी साथीस घ्यावें


हो मात त्या एक एक सत्कर्माची समिधा

उ स्फुर्त पणे प्रेमाने अर्पावी आणि

दे णाऱ्याचे हात घेऊन


जीवन सार्थकी लावून

कृथार्थ व्हावे....!!!

सुप्रभात...!


Rate this content
Log in