सेवा
सेवा
1 min
211
बागडावे फुलपाखरांपरी
या फुलावर त्या फुलांवर
प्रेम बरसावे रंग निरखावे
हरखूनि जावे
बागडावे फुलपाखरांपरी
गंध सुगंध प्राशुनि घ्यावे
मधुरस पीयूष चाखावे
बागडावे फुलपाखरांपरी
वाहू पदोपदी परागकण हे
नवचैतन्याची करु पखरण रे
पदी सेवा रुजू नकळत कणकण
आनंदाने विहरावे
बागडावे फुलपाखरांपरी
