STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

सेल्फी

सेल्फी

1 min
245

जरा अन् वार्धक्याला

नाही भिऊन जायचे

आनंदाने वार्धक्यात

सुखेनैव जगायचे     (१)


गेले तंत्रज्ञान पुढे 

येती फटाफटा फोटो

आम्हीपण नाही मागे

सेल्फी पटकन घेतो    (२)


नव्या तंत्राचे शिक्षण 

घेतो ज्येष्ठ सारेजण

आता येतो मलापण

सेल्फी फोटो झटकन   (३)


वय वाढले तरीही

मन आमचे तरुण

घेतो आनंद दोघेही

फोटो स्वतःच काढून   (४)


मोल नसते हौसेला

मनी फोटोचा आनंद

सुहास्यचि मुखावरी

अनमोल हा स्वानंद     (५)


छोट्या आपल्या जीवनी

नित्य आनंदी असावे

राहू नये विसंबूनी

फोटो स्वतःच काढावे   (६)


Rate this content
Log in