सबलीकरण ( काव्यांजली )
सबलीकरण ( काव्यांजली )
1 min
259
महिला सबलीकरण
होईल का कधी ?
निर्णय घेती
पुरुषच.................१
आरक्षीत जागेवर
उभी महिला घरची
खरा विजयी
पुरुषच.................२
खुर्ची बाजूला
दिमाखदार पहा पती
स्वाक्षरी करती
पुरुषच..................३
विचारसरणी पुरुषसत्ताक
महिला आजही समजती
वहाण पायाची
पुरुषच..................४
