सौंदर्याने भरभराटलेले गवतफुल
सौंदर्याने भरभराटलेले गवतफुल
1 min
298
हिरवे-हिरवे दार झुबके झुबके दार,
त्याला मी पाहिले आमच्या शेतावर.
दिसत होते डौलदार आणि फार छान,
त्याला पाहून मी विसरलो भूक आणि तहान.
होते ते टील्ले टील्ले आणि फारच लहान,
पण सौंदर्याने जिंकून घेतला त्याने आपला मान.
सुंदर सुंदर हिरवे हिरवे होते त्याचे तन,
सौंदर्याने जिंकून घेतले त्याने माझे मन.
साऱ्या फुलांपेक्षा ते गवतफुल होते न्यारे,
त्याला पाहून भारावलो आम्ही मित्र सारे.
