STORYMIRROR

Sunil Deokule

Others

2  

Sunil Deokule

Others

सौंदर्य तुझे कशात?

सौंदर्य तुझे कशात?

1 min
4.0K


सौंदर्य तुझे कशात?

तू असशील गोरीपान

किंवा सौंदर्याची खाण

लांबसडक केस असतील

तुझ्या सौंदर्याचे परिमाण

देहयष्टी कमनीय सुडौल

संगमरवरी वाटत असेल

चाल तुझी छान असेल

मांड्या केळीचा गाभा भासेल

हनुवटीवर तीळ काळसर

डोळे टपोरे पाणीदार

छातीचा मदमस्त भार

टोकेही त्यावर दाणेदार

पण एक लक्षात घे तू बाला

सौंदर्याचं रहस्य लहान

महत्व जाण जरी रंग काळा

रंग हा आहे रंगात महान

तुझ्या गो-यापान देहावर

जिथे काळा रंग असेल

तेच अन् तेच तुझ्या ह्या

सौंदर्याचं शक्तिस्थळ असेल...


Rate this content
Log in